पोलिस दलातील ३७९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…सुर्यवंशी,केंजळे,म्हेत्रे,कठाळेंची बदली

0
697
गोंदिया,दि.०१-राज्यातील लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता नुकतीच संपुष्टात आली असून जून महिन्यात दरवर्षी प्रमाणे पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियमित बदल्यांची प्रकिया सुरू झाली आहे.यात ज्यांचे नियमित कालावधी पूर्ण व्हायचा आहे,अशा १२० पोलिस निरीक्षकांच्या त्यांच्या विनंतीवरून तर २५९ पोलिस निरीक्षकांचा विहित कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या नियमित बदल्यांचे आदेश ३० जून २०२४ ला  काढण्यात आले आहेत.
यामध्ये गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे चंद्रकांत सुर्यवंशी यांची पुणे शहर,रामनगरचे संदेश केंजळे यांची पुणे ग्रामीण,सायबर शाखेचे सचिन म्हेत्रे यांची सातारा,देवीदास कठाळे यांची नवी मुंबई,प्रतापराव भोसले  यांची नागपूर ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे.तर वर्धा येथून प्रविण मुंडे, नागपूर येथून रामेश्वर पिपरेवार,नागपूर शहरातून नागेश भास्कर,वर्धा येथून वैशाली ढाले यांची गोंंदिया जिल्ह्यात बदलीचे आदेश काढण्यात आले आहे.

विनंतीवरून बदली करण्यात आलेले पोलिस निरीक्षक यांची यादी.





विहित कालावधी पूर्ण झाल्याने करण्यात आलेल्या बदल्या.