Home महाराष्ट्र सैराट आता माझा भाग नाही – नागराज मंजुळे

सैराट आता माझा भाग नाही – नागराज मंजुळे

0

मुंबई- ’सैराट’सारख्या चित्रपटांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी भाजपाच्या आमदार मनीषा चौधरी यांनी केली असून या मागणीवर नागराज मंजुळे यांनी प्रतिक्रीया दिली.
‘सैराट हा आता माझा भाग राहिलेला नाही. ज्यांना बंदी घालायची आहे त्यांनी घालावी. ज्यांना बघायचा आहे त्यांनी बघावा’, असे नागराज मंजुळे म्हणाले.
मनीषा चौधरी यांनी कोपर्डी बलात्काराच्या घटनेचा संबंध `सैराट’ चित्रपटाशी जोडून अशा चित्रपटांमुळे तरुण पिढी बिघडत असल्याचा जावईशोध लावला. यावर नागराज मंजुळेंना विचारले असता त्यांनी सैराट हा आता माझा भाग राहिलेला नसल्याचे सांगितले.
‘चित्रपटावर बंदी घालून जग सुधारले असते तर मग किती बदलले असते. त्यामुळे ज्यांनी हे वक्तव्य केले त्यांनी जरुर याचा विचार करावा तसेच ज्यांनी त्यांचे बोलणे ऐकले त्यांनीही यावर जरुर विचार करावा’, असे मंजुळे यावेळी म्हणाले.

Exit mobile version