राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणुकीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान
रायगड, दि. 26 -लोकशाही बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असून मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. नवं मतदारांनी अन्य युवकांना मतदार नोंदणी आणि मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात १५ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपवनसंरक्षक राहूल पाटील, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबादास देवमाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे,उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, महेश पाटील ,मुकेश चव्हाण तहसीलदार विक्रम पाटील, दिव्यांग आयकॉन पवार, युथ आयकॉन तपस्वी गोंधळी आदी उपस्थित होते.

लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान देणाऱ्या पुरस्कारार्थांचे अभिनंदन करून जिल्हाधिकारी म्हणाले, नवमतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, त्यांची मतदार म्हणून नोंदणी व्हावी, हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागील उद्देश आहे. मतदार यादी सर्वसमावेशक व्हावी यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. महिला, दिव्यांग, आदिवासी, कामगार आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
सध्या 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदाराची टक्केवारी वाढत आहे. या युवकांची नोंदणी करून त्यांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे. ज्यां नवमतदार यांनी मताधिकार बजावला आहे त्यांनी हे जनजागृती करावी. तसेच मतदार नोंदणीसाठी युवक व युवतींनी प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी यावेळी केले.

प्रास्ताविक करताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांनी मतदार दिन कार्यक्रमाची माहिती दिली. भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाल्याने २०११ पासून मतदार जागृतीसाठी हा दिवस साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या संदेशाची चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी निवडणूक खर्च पथक प्रमुख जिल्हा वित्त वकोषागार अधिकारी राहुल कदम व नवमतदार कु. संयोगिनी नाईक हिने मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ देण्यात आली.
उत्कृष्ट कामगिरीसाठी अधिकारी व कर्मचारी सत्कार
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी, मुकेश चव्हाण,महेश पाटील,उत्कृष्ट समन्वय अधिकारी,समन्वय अधिकारी मतदान यंत्र व्यवस्थापन, टपाली मतदान व मतमोजणी ज्ञानेश्वर खुटवड,समन्वय अधिकारी निवडणूक खर्च नियंत्रण समिती,राहुल कदम,समन्वय अधिकारी मिडीया/प्रसिध्दी माध्यमे समिती,श्रीमती. मनिषा पिंगळे, छायाचित्रकार,जयंत ठाकूर, दै.लोकमत,राजेश भोस्तेकर तसेच इतर विभागातील मतदार नोंदणी अधिकारी/सहायक मतदार नोंदणी अधिकारी / निवडणुक नायब तहसिलदार / महसूल सहायक अधिकारी/महसूल सहायक/शिपाई/काटा एंन्ट्री ऑपरेटर/मतदान केंद्रस्तरीय अधिकारी/महाविद्यालय यां अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.