व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक कंपनीने डिजिटल इंडिया साकारण्यात योगदान द्यावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
9

मुंबईदि.  १९ : डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक लिमिटेड कंपनीने योगदान द्यावेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक लिमिटेडच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील नोंदणी (लिस्टिंग) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक लिमिटेडच्या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानाहून ऑनलाइन उपस्थित होते. यावेळी व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक कंपनीचे उपाध्यक्ष आशुतोष घोलप उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीसन १९९७ मध्ये व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक कंपनीची सुरुवात नागपूरमध्ये अविनाश शेंडे आणि सचिन पांडे यांनी केली. छोट्या स्वरूपात सुरू झालेली ही कंपनी भारताच्या आयटी क्षेत्रात एक मोठी शक्ती बनली आहेयांचा अवघ्या महाराष्ट्राला अभिमान आहे. कंपनीची  देशात १६ ठिकाणी व विदेशात तीन ठिकाणी कार्यालय आहेत.या कंपनीला मिहान नागपूर येथील येथे १० एकर जागा मिळाली असून येथील मोठ्या प्रमाणात उद्योग विकास होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतीलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अविनाश शेंडे आणि सचिन पांडे सारख्या तज्ज्ञ व्यक्तींनी त्यांची स्वप्ने साकार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा प्रवास आपल्या राज्यातील हजारो उद्योजकांना प्रेरणा देईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक लि. कंपनीच्या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते यावेळी अनावरण करण्यात आले.