41.3 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ७०० हून अधिक नागरिकांना थेट लाभ

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ७०० हून अधिक नागरिकांना थेट लाभ

0
22

blank

पहूर येथे २५ विभागांचे ३८ स्टॉल्स; योजनांचा लाभ मिळाल्याने नागरिक संतुष्ट
जळगाव दि. 28 :- छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाअंतर्गत पहूर महसूल मंडळाचे समाधान शिबिर आज चंदन मंगल कार्यालय, पहूर येथे उत्साहात पार पडले. २५ विभागांच्या ३८ स्टॉल्सद्वारे ७०१ नागरिकांना थेट लाभ देण्यात आला. सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने नागरिकांची मोठी सोय झाली.
शिबिरात पी. एम. किसान लाभार्थी ७ लाभार्थी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सेवा: ८२ लाभार्थी, पुरवठा शाखा ५८ लाभार्थी, सेतू केंद्रामार्फत ४५ लाभार्थी, संजय गांधी योजना (DBT प्रक्रिया): ५०७ लाभार्थी अंतर्गत तब्बल ५०७ लाभार्थ्यांना थेट लाभ मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या प्रास्ताविकाने झाले. त्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देत नागरिकांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी पहूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
शिबिरात नागरिकांची कामे तत्काळ मार्गी लागल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले. अनेक नागरिकांनी “पूर्वी महिनाभर लागणारी कामे एका दिवसात झाली”, “वेळ आणि पैशांची बचत झाली”, अशी प्रतिक्रिया दिली. शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढवून योजनांची अंमलबजावणी गतीमान व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम यशस्वी ठरला, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.