कृषिदिनाला मतदार दिन करण्याचा भाजप सरकारचा डाव

0
6

मुंबई,दि.22 : राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या दिवशी मतदार दिन साजरा करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी रविवारी विधान परिषदेत दिले.
राज्यात वस्तू आणि सेवा कर पद्धत म्हणजेच जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी दुपारी १२ वाजता कामकाजाला सुरुवात झाली. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे महाराष्ट्रातल्या हरितक्रांतीचे जनक व राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा विषय उपस्थित केला. हा दिवस राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच दिवशी राज्य सरकारने ‘मतदार दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी दिनी मतदार दिन साजरा करण्यामागे नाईक यांचे महत्त्व वाढवण्याचा उद्देश आहे, असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे मोठे योगदान आहे. सुधारित बियाण्यांच्या माध्यमातून राज्यात हरितक्रांती करण्यात त्यांचे योगदान
आहे. म्हणूनच त्यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून राज्य सरकार साजरा करत असते. परंतु, भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून काही महापुरुषांचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाईक यांच्या जन्मदिनी पुन्हा मतदार दिन साजरा करण्यामागे तसाच उद्देश दिसतो, अशी शंका सामान्य माणसांच्या मनात निर्माण होऊ शकते. त्यामुळे मतदार दिनासाठी अन्य एखादा दिवस योजनांची नावे बदलण्याचा सपाटाकेंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून काँग्रेसच्या नेत्यांची नावे असलेल्या योजना बदलण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. हा दिवस बदलण्यामागे तोच उद्देश दिसतो, असा आरोप काँग्रेसचे भाई जगताप यांनी केला. शेकापचे जयंत पाटील यांनीही त्याला पाठिंबा दिला. त्यावर सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून त्यांच्या निर्णयात राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. धनंजय मुंडे यांनी पाटील यांना तिथेच रोखले. ते म्हणाले की, हा निर्णय निवडणूक आयोगाचा नाही तर राज्य सरकारचा आहे. हा शासन निर्णय राज्य सरकारने पारित केला आहे. त्यानंतर त्यांनी तो निर्णय सभागृहात सादर केला. त्यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सरकारला निर्देश दिले की, वसंतराव नाईक यांचे महत्त्व कमी होऊ नये यासाठी सरकाने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. सभापतींच्या निर्देशानंतर या विषयावर पडदा पडला.निवडावा, असे मुंडे म्हणाले.
काँग्रेसचे हरिभाऊ राठोड यांनी मुंडे यांच्या मुद्दय़ाला पाठिंबा दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाने २५ जानेवारी हा दिवस मतदान दिवस जाहीर केलेला आहे. असे असताना पुन्हा मतदार दिन साजरा करण्याची काय गरज आहे? असा सवाल त्यांनी केला. हा निर्णय आता घेण्यामागे फक्त नाईक यांचे महत्त्व वाढवण्याचाच उद्देश दिसतो, असे राठोड यांनी सांगितले.