बिलोली – देगलूर मार्गावरील पुलाचे बांधकाम निकृष्ट दजाचे

0
16

नांदेड ( सय्यद रियाज ),दि.27- बिलोली शहरापासून 3कि मी वर असलेले  पोखर्णी फाट्या पासुन 16 किमी पर्यत रुंदी करणाचे काम अनेक दिवसा पासुन सुरु आहे . पोखर्णी फाटा   ते आदमपुर हे आंतर  16 कि.मी. आहे .  या एवढ्या अंतरामध्ये मात्रछोटे मोठे  7ते 8 पूल बांधण्यात येत  आहेत.  पुलाची सरक्षण भिंत तीन ते चार  दिवसात पडुन गेली आहे  व भेगा पडल्याचे दिसून येते या सर्व पुलांचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे  त्या पुलावर मोठ्या प्रमाणात  भेगा पडले आहे चागल्या प्रकारे कीवरिंग होत नाही . निकृष्ट दर्जाचे सिमेंट व सिमेंट  चेप्रमान कमी असल्याचे दिसुन येते. अजून पुलाचे काम अजून पुर्ण झाले नाही तर  पुलाचे काम सुरुच अस्तातांना पडत आहे असेच बोगस कामे केले जात आहे. तर  पुल भविष्यात कसे ठीकणार ?  सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलाची पहाणी करत नाही का ? असा प्रश्न निर्मान होत आहे.

जागो जागी मोठमोठे  खड्डे करुन मोठ्या प्रमाणात मुरुम व खडक काढाले जात आहे .रोडा लगत 10ते 12 फुट खोल व  10 0 फुटा पेक्षा जास्त लाबीचे उत्खनन केले गेले आहे.  तेथुनच मोटर सायकल ,आटो , जिप ,अदि अनेक वाहणांना   जिव मुठीत घेउन  प्रवास करावा लागत आहे . या प्रकाराकडे संबंधित विभाग का कानाडोळा करत आहे . संबंधित विभागाकडून मोठ मोठे खड्डे करण्याची परवानगी देण्यात आली आहे का ? जिवीत हाणी झाल्यास कोण जवाबदार ? असा  प्रश्न उपस्थित झाल्याने या कामाबाबत बांधकाम विभागाने दखल घेऊन कामाची चौकशी करणे गरजेचे  आहे. मात्र, बांधकाम विभागाचे अधिकारी निकृष्ट काम होऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आर्थिक तडजोडी करून स्वतःचा खिसा भरून मोकळे होत आहेत,  असे जनते कडून बोलले जात. आहे.