32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेच्या नागपूर विभागीय सचिवपदी कमलेश बिसेन बिनविरोध

ग्रामसेवक संघटनेच्या नागपूर विभागीय सचिवपदी कमलेश बिसेन बिनविरोध

0
33

blank

अहमदनगर,दि.18– महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या नागपूर विभागीय सचिवपदावर गोंदिया जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे सक्रिय पदाधिकारी कमलेश बिसेन यांची विभागीय सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बिसेन यांची निवड अहमदनगर येथे रविवार(दि.17 सप्टेंबरला) पार पडलेल्या राज्यस्तरीय सभेत करण्यात आली. भव्य शोभायात्रा काढून हॉटेल परडाईज सभागृहात संपूर्ण राज्य ग्रामसेवक मेळाव्यात बिसेन यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संपूर्ण राज्य पदाधिकारी यांचाही नागरी सत्कार करण्यात आला. राज्यातील 22000 ग्रामसेवकांनी दाखविलेला विश्वास आपण व्यर्थ जाऊ देणार नाही. गावाचा विकासाचा कणा असलेल्या संवर्गाच्या समस्या पूर्ण प्रामाणिकपणे शासन दरबारी मांडून सोडविण्याचा निर्धार नवनियुक्त विभागीय सचिव कमलेश बिसेन यांनी व्यक्त केला.त्यांच्या पुढील कार्यासाठी जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण, प्रदीप ठाकरे,लक्ष्मण ठाकरे, भागेश चव्हाण, रामा जमाईवर, ओ. जी. बिसेन, कुलदीप कापगते, योगेश रुद्राकर, मेश्राम, खोटेले, सचिन कुथे ,फटींग सिरसाट व सर्व जिल्हा तालुका पद्धधिकार्यांनी  तसेच ग्रामसेवकांनी  शुभेच्छा दिल्या.

blank