नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे व दुर्गंधीमुळे नागरिक हैराण

0
19

शेखर भोसले/मुलुंड,दि.27: मुलुंड पश्चिम येथील नेताजी सुभाष रोडवरील पालिकेचा ड्रेनेज नाला खूप दिवसांपासून ओसंडून वाहत असल्यामुळे आईडीबीआई बैंकच्या समोरुन त्या नाल्याचे घाणेरडे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. पालिकेकडून हा नाला नियमितपणे व्यवस्थित साफ न झाल्यामुळे सदर नाला ओसंडून वाहत आहे असे स्थानिकांनी सांगितले.रस्त्यावरच महावितरणच्या जागृत केबल्स व वायर्स या पाण्यात पडलेल्या आहेत कदाचित भविष्यात शॉर्टसर्किट झाले तर विद्युत प्रवाह पाण्यामध्ये येवून तिथून मार्गक्रमण करणाऱ्या सामान्य नागरिकांना व शाळकरी मुलांना धोका होवू शकतो व मोठी दुर्घटना घडू शकते.

जवळच असलेल्या बसस्टॉप व रिक्षा स्टँड वरील प्रवासी व स्थानिक नागरिक, रस्त्यावरून वाहणाऱ्या नाल्याच्या पाण्याच्या दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत व नाक बंद करूनच तेथून प्रवास करत आहेत. रस्त्यावर आलेल्या ह्या नाल्याच्या पाण्यामुळे आरोग्यास अपाय देखील होवू शकतो असे स्थानिकांनी सदर प्रतिनिधीच्या निदर्शनास आणून दिले आहे. पालिकेला यासंबधीच्या अनेक तक्रारी स्थानिकांकडून देण्यात आल्या आहेत परंतु नेहमी प्रमाणे या तक्रारींना केराची टोपली दाखवली जाते व नागरिकांच्या समस्येकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते हा पालिका अधिकारांचा अनुभव आहे असे देखील स्थानिकांनी सांगितले. ग्रस्त नागरिक नगरसेवक व पालिका अधिकारी करतात तरी काय हा सवाल नागरिक करीत आहेत.