बिंदूमाधव जोशी यांचे निधन

0
11

पुणे दि.१० – अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष बिंदूमाधव जोशी यांचे रविवारी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते.
मागील वर्षभरापासून ते हृदय आणि फुफ्फुसाच्या विकाराने आजारी होते. प्रकृती खालावल्यामुळे जोशी यांना मागील आठवड्यात उपचारासाठी रुणालयात दाखल करण्यात आले होते.
रविवारी दुपारी सव्वा तीनला त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव सायंकाळी सहा ते आठ दरम्यान कसबा पेठेतील ‘पसायदान‘ या बंगल्यात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर नवी पेठेतील ‘वैकुंठ’ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील, असे ग्राहक पेठेचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी सांगितले.