38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home महाराष्ट्र वनपट्टेधारक,वनदावे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनाही मदत देणार- विजय वडेट्टीवार

वनपट्टेधारक,वनदावे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनाही मदत देणार- विजय वडेट्टीवार

0
42
minister Vijay Wadettiwar-minister of state for forests, is acting in an under production movie titled Aadhar. The movie is about a 10-year-old girl who is shunned by her family and schoolmates after it becomes known she has AIDS. A doctor adopts her and is felicitated by chief minister Chavan, played by Wadettiwar. -pic shriya patil shinde

मुंबई, दि. 6 : ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये क्यार व महाचक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानीपोटी द्यावयाची मदत वनपट्टेधारक व वनदावे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.श्री.वडेट्टीवार म्हणाले, सन 2018 च्या खरीप हंगामातून दुष्काळाच्या वेळी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार वनपट्टेधारकांना व ज्यांचे वनदावे प्रलंबित आहे अश्या सर्व शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या विनंतीनुसार याच धर्तीवर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मधील अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसाणीसाठी झालेल्या वनपट्टेधारकांना व ज्यांचे वनदावे प्रलंबित आहे अश्या सर्व शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र समजण्यात यावे व त्यांना अनुदान वाटप करण्यास परवानगी मिळावी असे कळविले आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मागणीनुसार ज्या मंजूर वनपट्टेधारक व प्रलंबित वनपट्टेधारक यांच्या जमिनीवर असलेल्या पिकांचे माहे ऑक्टोबर 2019 मध्ये “क्यार” व महाचक्रिवादळामुळे ज्यांच्या जमिनीवर झालेल्या अवेळी पावसाने शेती नुकसानी संबंधात पंचनामा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव यांच्या स्तरावरून संबंधित तहसीलदार यांना निर्देश देण्यात आलेले होते.  त्यानुसार जळगांव जिल्हयात एकूण 1513 मंजूर वनपट्टेधारक व 2472 प्रलंबित वनपट्टेधारक यांचे नुकसान झाले आहे.

            महाराष्ट्रात जळगांव आणि  विशेषत: विदर्भातील अशा शेतकऱ्यांचे नुकसान विचारात घेऊन याची तातडीने दखल घेवून राज्यातील सर्व वनपट्टेधारकांना व ज्यांचे वनदावे प्रलंबित आहे असे सर्व शेतकरी मदतीसाठी पात्र राहतील असा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, त्यांना शेती पिके नुकसानीचे रू. 8 हजार प्रति हेक्टर तर बहुवार्षिक पिके (फळबाग) रू. 18 हजार प्रति हेक्टर अशी नुकसान भरपाई मिळणार असल्याचेही श्री. वडेट्टीवार म्हणाले.