
【शिस्त लावण्यासाठी कधीतरी टार्गेट ठेवा!】
नांदेड–नांदेड शहरात गत १५,१६ महिन्यांपासून लागू असलेल्या ताळेबंदी असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेतच,यादरम्यान शहरातील वाहतूक शाखेतर्फे प्रचंड प्रमाणात दंड आकारण्यात आला,काही दंड वसुलही झाला पण दंड आकारणे किंवा वसूल करणे यापेक्षा शहरात शिस्त लागणे याबद्दल वाहतूक शाखेतर्फे कोणती उपाययोजना राबविली गेली,टार्गेट पूर्णपणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून जर शहर वाहतुक शाखा चालत असेल तर फक्त दण्डच लागत राहील,नागरिकांना शिस्त कधीही लागणार नाही.
तसेच गत २ आठवड्यांपासून शहरात अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प असलेली पहावयास मिळतेय,परंतु शहर वाहतुक शाखेतर्फे ही वाहतूक सुरळीत कशी होईल याबाबत काहीच प्रयत्न होताना दिसत नाहीत,काही ठिकाणी तर वाहतूक ठप्प असलेली पाहूनही वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी अग्रेसर नसल्याचेही निदर्शनास आले,या काही वाहतूक ठप्प होणाऱ्या पॉईंटवर वाहतूक पोलीस कर्मचारी मोबाईल द्वारे फोटो घेऊन स्वयंचलित मशिनला तो फोटो अपलोड करत असतात,असेही निदर्शनास आलेले आहे.
टार्गेट डोळ्यासमोर ठेवून जसे दंड आकारणे याकडे लक्ष असते,तसेच जर वाहतूक सुरळीत करणे,नागरिकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगणे यासारखे मार्गदर्शक विषय डोळ्यासमोर ठेवून जर काम केले तर नक्कीच जनताही आपल्याला सहकार्य करेलच यात शंका नाहीच!
ताळेबंदी मुळे सर्वसामान्य नागरिकांकडे पैसे उरलेले नाहीत,पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे जनता त्रस्त आहे आणि वाहतूक शाखा बिनधास्त दंड आकारण्यात व्यस्त आहे.
काल दि.०५ जुलै सोमवारी शहरात विविध भागांमध्ये प्रचंड वाहतूक ठप्प होती,यात काही ठिकाणी रुग्णवाहिका व नागरिकांना प्रचंड त्रास जाणवला यादरम्यान जर एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला असता,किंवा या ठप्प असलेल्या वाहतूकीमुळे अपघात झाला असता तर यास कोण जबाबदार राहणार?
एक संतप्त नांदेडकर