
याचे घाण पाणी रस्त्यावर पसरत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फवारणी झाली नसून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच वसंत टॉकीजपासून ते जामनेर रोड पर्यंत रस्त्यांची चाळणी झाली असून खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. तसेच अनेक कॉलन्यांमध्ये पथदिवे, सार्वजनिक शौचालये उभारण्याची गरज असून याबाबत तातडीने उपायोजना कराव्यात अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे. उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी ऍड. विजय लक्ष्मी मुत्याल , ऍड. मनीष कुमार वर्मा ,ऍड . योगेश दलाल , ऍड . सचिन कोष्टी , ऍड. दुर्गेश लहासे, ऍड. जगदीश भालेराव, रवींद्र लेकुरवाडे , अशोक मेढे ,ऍड. भूपेश बाविस्कर आदी उपस्थित होते.