मादळमोहीत ट्रॅक्टर अपघात.एका बालकाला चिरडले तर एक जखमी!

0
26

बीड-..एका ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणाने टॅंकर चालवत देवदर्शनासाठी आपल्या आज्जीसोबत जात असलेल्या बालकाला चिरडल्याची घटना आज दुपारी 13 जानेवारी गुरुवारला मादळमोही येथील महावितरण कार्यालयात जवळ आसणार्या‌ पुलावर‌ घडली. वंजारी वाडी येथील.श्री.चोरमले यांच्या ट्रॅक्टरने येथील माऊली आणि रुद्र चव्हाण वय चार वर्ष या बालकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असणाऱ्या त्यांच्या आजी या जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे मादळमोही गावात हळहळ व्यक्त होत असून घडलेल्या घटने संदर्भात गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी की आज 13 जानेवारी रोजी एकादशी असल्याने मादळमोही येथील अनिरुद्ध चव्हाण यांचा मुलगा माऊली हा आपल्या आजी सोबत गावातीलच संत जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान येथे देव दर्शनाला जाताना वंजारवाडी येथील नवीन घेतलेला ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणाने ट्रॅक्टर चालवून पायी जात असलेल्या 4 वर्षाच्या बालकाला चिरडल्याने तो जागीच ठार झाला आहे. तर त्याच्या सोबत असणाऱ्या आजी सुमनबाई जालीदंर चव्हाण ह्या जखमी झाल्या आहेत.सदरील अपघाताचा पंचनामा मादळमोही पोलीस चौकीचे जमादार राजेंद्र गर्जे. पोलीस कॉन्स्टेबल कदम साहेब यांनी केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पेरगुलवार.व ए पी.आय संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.