38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home मराठवाडा/खान्देश आडनावांच्या आधारे ओबीसींचा इंपेरिकल डेटा गोळा करणे तात्काळ थांबवा – नवनाथ (आबा)...

आडनावांच्या आधारे ओबीसींचा इंपेरिकल डेटा गोळा करणे तात्काळ थांबवा – नवनाथ (आबा) वाघमारे

0
24

blank

**अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे निदर्शने करून मुख्यमंत्र्यांना निवेदन
जालना,दि.15 प्रतिनिधी – समर्पित बांठीया आयोगाच्या मार्फत ओबीसींचा एम्पिरिकल डेटा चुकीच्या पद्धतीने गोळा करण्याचे काम चालू असून ते तात्काळ थांबून गावागावात जाऊन प्रत्यक्ष करावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र शब्दात निदर्शने केली व संबंधित डेटा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, आडनावावरून गोळा करणे अत्यंत चुकीचे आहे असेही आंदोलकांचे म्हणणे होते यावेळी आंदोलकांनी अशी मागणी केली की संबंधीत समर्पित बांठीया आयोगाच्या मार्फत जो ऑफिसमध्ये बसून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आडनावावरून डाटा गोळा करण्याचे काम हे अत्यंत चुकीचे असून अशा पद्धतीने डाटा गोळा केल्याने ओबीसींची खरी आकडेवारी कळणार नाही व ओबीसींचे मोठे नुकसान होणार आहे, म्हणुन तसा ओबीसी वरील अन्याय कारक डाटा गोळा करणे तात्काळ थांबवावे व त्या ऐवजी गावा गावांमध्ये जाऊन प्रत्येक घरांमध्ये जाऊन ज्यामध्ये बी.एल. ओ. मार्फत शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या माध्यमातून डाटा गोळा करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. तसे न केल्यास अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलने करण्यात येतील असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी निवेदनाद्वारे दिला. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथआबा वाघमारे, वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम वराडे, ऑल इंडिया मोमीन कॉन्फरन्सचे जिल्हाध्यक्ष मोइज् अन्सारी, उपाध्यक्ष सुधाकर घेर, सुंदरराव कुदळे, गणेश वाघमारे, मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते ईकबाल कुरेशी, दशरथ तोंडूळे, दीपक वैद्य, ज्ञानेश्वर खरात, राजकुमार बुलबुले, गणेश तरासे,सुभाष गिराम, अनिल वाघमारे, राम गिराम, निळकंठ खलसे, शुभम जाधव,सदाशिव पटेकर, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

blank