अवैध सावकारी..दोन लाखांच्या बदल्यात दिले बावीस लाख; तरी काबीज करण्यात आले दुकान

0
43

धुळे : अवैध सावकारी प्रकरणाने गेल्या पंधरा दिवसात धुळे हादरले असताना आणखी एक अवैध सावकारांचा धक्कादायक कारनामा उघड झाला आहे. ट्रॅव्हल्स चालकाला दोन लाखांचे कर्ज दिले त्याबदल्यात 22 लाखांची वसुली केली गेली. तरीही त्याच्या रोजीरोटीचे साधन असलेले दुकान संबंधित सावकारांने हिसकावण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर (Police) पोलिस ठाण्यात तिघा अवैध सावकार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अवैध सावकारी प्रकरणाने गेल्या पंधरा दिवसांपासून धुळे (Dhule) शहर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेले असताना आणखी एक अवैध सावकारीचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील अनमोल नगरात राहणाऱ्या निलेश पवार यांनी आपल्या व्यवसायासाठी सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले (Crime) होते. त्याबदल्यात 22 लाखांची वसुली देखील केली गेली. या सोबत त्यांचे रोजीरोटीची साधन असलेले दुकान देखील हिसकावून घेतले.

दुकानासाठी अकरा लाखाची मागणी

दुकान ताब्यात हवे असेल तर अकरा लाख रुपये रक्कमेची मागणी अवैध सावकारातर्फे केली जात आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात अवैध सावकारीचा धंदा करणाऱ्या गणेश बागुल, नीलेश हरळ आणि वाल्मिक हरल या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात पोलिसांतर्फे काय कारवाई करण्यात येते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.