धर्माबादमध्ये वीज पडून शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू

0
30

धर्माबाद(साहेबराव दुगाने)-धर्माबाद येथील जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळेतील इयत्ता नववी मध्ये शिकणारी विद्यार्थीनी स्वाती कामाजी आवरे(वय 15)रा. चिकना येथील ही विद्यार्थीनी शाळा सुटल्यानंतर  गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकावर बस येण्याची वाट बघत असतानाच सायंकाळी अंदाजे 4:00 ते 4:30 च्या सुमारास तिच्या अंगावर विज पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
सदर विद्यार्थिनीला धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.वेणुगोपाल पंडित यांनी सदर विद्यार्थीनीला मृत घोषित केले.स्वाती आवरेसोबत असलेल्या तिच्या दोन मैत्रिणीही बसकडे जात असतना त्या थोडक्यात बचावल्या. सदर घटनेमुळे धर्माबाद परिसरासह चिकना गावावर शोककळा पसरली आहे.