34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home मराठवाडा/खान्देश २० वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र!

२० वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र!

0
158

blank

माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

नांदेड-जुन्या आठवणींना उजाळा देत ज.ने.वि. बरबडा २००३ च्या दहावी च्या बॅच तर्फे आलिशान अतिथी हॉटेल नांदेड येथे स्नेह्भोज कार्यक्रम ठेवण्यात आला होता.स्नेहभोजनाच्या निमित्ताने तब्बल २०वर्षानंतर सर्व मित्रपरिवार एकत्र आला होता, बालपणीच्या आठवणीत रमलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुललेले दिसत होते.
२००३ च्या बॅचचे लाडके शिक्षक तथा आजीवन मार्गदर्शक कंडापल्ले सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमची रूपरेषा ठरवण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक संतोष नलबलवार यांनी केले.रीतसर शाळेची घंटा वाजवून हॉल मधे बसत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
स्नेहमिलन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वर्गमित्र माधवराव धर्माधिकारी यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून ज.ने.वि. माधव कंडापल्ले यांची निवड करण्यात आली. तर कार्यक्रमाचे संयोजक प्रतिनिधी म्हणून धर्माबाद यांचे प्रतिनिधी तथा शा.व्य.स.श्री सायलू मुतनवाड यांची निवड करण्यात आली. उपस्थित सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपला वैयक्तिक परिचय करून दिला.अनेकांनी आपल्या शैलीत तर कोणी मिश्किल पणे जुन्या आठवणींना उजाळा दिला. बरबडा,अंतरगाव,वजीरगाव, नांदेड येथील जवळपास सर्व माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते आणि आगामी होणाऱ्या भव्य स्नेहमिलन कार्यक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पांपटवार व आनंद आनेमवाड यांनी केलं. स्नेहभोजनानंतर खडूं गुंडुले यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली.

blank