वर्ग-२ झालेली जमीन वर्ग-१ करण्यात यावे यासह इतर मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

0
28
धाराशिव :– तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथील देवस्थान इनाम रद्य करण्यात यावे.  तुळजापुर तहसीलदार यांच्या सोबत घडलेल्या प्रकाराबाबत सखोल चौकशी करुन दोषीवर कायदेशिर कायर्वाही करावी या मागणीसाठी १९ डिसेंबर पासून आमरण उपोषण आज पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
 निलेगाव येथील गट नंबर ४४/२, ४४/१, ४१ व १४१ हे वर्ग दोन झाले आहेत. वारंवार अर्ज देऊन पण हे गट नंबर वर्ग-१ करण्यात आले नाहीत. जमिनी हे खालसा झालेल्या आहेत व मा. उपजिल्हाधिकारी , महसूल, धाराशिव यांचेकडे जमिनीचे निकाल लागलेले आहेत. त्याप्रमाणे आमचे सर्व कागदपत्रे तपासून जमिनी हे वर्ग-१ करण्यात यावेत व इतर हक्कातील देवस्थान इनाम जमिन रद्द करण्यात यावे.  निलेगाव येथील गट नंबर ३०३ व ३०४ हे फेरफार क्रमांक ३४०२ प्रमाणे वर्ग-२ झाले होते, ते परत वर्ग -१ झालेल्या आहेत. याची चौकशी करण्यात यावे या मागणीसाठी शफीक अहमद अ.वाहेद रिसालदार व शिवाजी दूधभाते दोघेजण आज १९ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहेत.