35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, रासपच्या भंडारा जिल्हाध्यक्षांसह दोघांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, रासपच्या भंडारा जिल्हाध्यक्षांसह दोघांचा मृत्यू

0
49

blank

छत्रपती संभाजीनगर-समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाही, शुक्रवारी देखील आणखी एक भीषण अपघात घडला, महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकवर भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट डिझायर गाडी आदळली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू तर, अन्य दोन गंभीर जखमी असल्याची घटना घडली, ही घटना समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जवळ घडली.या भीषण अपघातात राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके (35) यांच्यासह संदीप साखरवाडे (40) यांचा मृत्यू झाला. तर, रितेश भानादकर (24) आणि आशिष सरवदे (37) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारा येथील हे पदाधिकारी मुंबईला रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना भेटण्याकरिता गेले होते. तिथून परतत असताना हा भीषण अपघात घडला.

blank