घरफोडी करणा-या नागपुर येथील सराईत गुन्हेगार जेरबंद

0
5
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.०८- जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणेतंर्गत घरफोडी करणा-या नागपुर येथील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने जेरबंद केले आहे.जिल्हयातील पो. ठाणे तिरोडा येथील – ३, आंमगांव -१, सालेकसा-१ असे एकुण ५ घरफोडी गुन्हयांची उकल आरोपीला ताब्यात घेत केली आहे.सराईत गुन्हेगारासह याप्रकरणात एका विधीसंंघर्ष बालकाचा समावेश असल्याचे पुढे आले आहे.त्या विधीसंघर्ष बालकाला समज देत पालकाच्या स्वाधिन करण्यात आले.

पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी पो.नि.स्थानिक गुन्हे, शाखा, गोंदिया आणि पोलीस पथकास जिल्हयातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत दाखल चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे  यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यास दाखल चोरी, घरफोडी गुन्हयातील सराईत गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हेगारांची गुन्हे करण्याचे पध्दतीचे माहीतीचे विष्लेशन करून सविस्तर माहीती घेण्यात येत होती.माहीती घेत असतांना ०६/०५/२०२४ रोजी पथकास गोपनीय बातमीदार, आणि गुन्हेगारांच्या तांत्रीक माहीतीच्या विश्लेषणा वरून पोलीस स्टेशन तिरोडा अंतर्गत हददीत घडलेल्या चोरी, घरफोडी गुन्हयांतील गुन्हेगार हा नागपुर येथील रहिवासी असुन त्यांने जिल्हयात बरेच घरफोडीचे गुन्हे केल्याचे लक्षात आले. त्या माहीतीच्या आधारे पथकाने नागपुर येथे जाऊन नागपुर येथील स्थानिक हुडकेश्वर पोलीसांचे मदतीने सराईत गुन्हेगार ईसम नामे- करण ऊर्फ रोहन दिलीप गाडगीलवार वय २३,रा.पार्वतीनगर,गल्ली न.५ रामेश्वरी ता.जि.नागपुर तसेच त्याचा साथीदार विधी संघर्ष बालक नामे आदित्य अशा दोघांना ताब्यात घेतले.नमूद दोघांनाही तिरोडा येथील घरफोडी गुन्हयांचे अनुषंगाने विश्वासात घेवून विचारपुस चौकशी केली असता पो. ठाणे तिरोडा येथील अप.क्र. १) २५६/ २०२४, २) २६९/२०२४ ३) २७०/२०२४ कलम ४५४, ३८० भांदवि तसेच पो.स्टे.आंमगांव गुरन.क्र. १५४/२०२४, पो.स्टे.सालेकसा गुरन. क्र. १११/२०२४ कलम ४५७, ३८० भांदवि चे एकुण ५ गुन्हे त्यांचा तिसरा फरार साथीदार आदर्श रमेश समर्थ वय अंदाजे २०,रा.पार्वतीनगर,गल्ली न.५ रामेश्वरी ता.जि.नागपुर याचेसह केल्याची कबुली दिली.जिल्हयात केलेल्या नमूद घरफोडी गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्येमाल संबंधात विचारपुस केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. जेरबंद करण्यात आलेला विधीसंघर्ष बालक- आदित्य यांस सुचनापत्र देवून त्याचे नातवाईकांचे सुपुर्द करून सोडण्यात आले आहे. तर सराईत आरोपी नामे- करण ऊर्फ रोहन दिलीप गाडगीलवार वय २३ वर्षे यांस पोलीस ठाणे तिरोडा पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे.गुन्हयाचे अनुषंगाने पुढील कायदेशिर कारवाई, आरोपीस अटक, गुन्हयातील मुद्येमाल जप्तीची प्रक्रिया तिरोडा पोलीसांद्वारे करण्यात येत आहे.

सदरची कामगीरी  वरीष्ठांचे निर्देश मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा. येथील पोलीस पथक स.पो.नि.विजय शिंदे, पोहवा. तुलसिदास लुटे, भुवन देशमुख, चित्तरंजन कोडापे, इंद्रजित बिसेन, सोमेंद्र तुरकर पोशि. संतोष केदार, अजय रहांगडाले, हंसराज भांडारकर, चापोहवा- लक्ष्मण बंजार, चापोशि- घनश्याम कुंभलवार तसेच तांत्रिक शाखेचे पो.हवा. धंनजय शेंडे, योगेश रहिले, यांनी केलेली आहे.