आंबलीतून ५० पेक्षा अधिक जणांना विषबाधा

0
31

नांदेड (Nanded):- जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील लालवंडी गावात विषबाधेची (poisoning) घटना घडली. महादेवाच्या भंडाऱ्यातून हा सर्व प्रकार घडला. या घटनेत ५० पेक्षा अधिक जणांना उलटी- मळमळ होत असल्याने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री लालवंडी गावात महादेवाचा भंडारा होता. भंडाऱ्यात आंबील बनवण्यात आली होती. आंबील खाल्याने गावातील अनेकांना बुधवारी मध्यरात्री उलटी, मळमळी चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. रुग्णांना तातडीने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती(nature) सध्या स्थिर आहे.