पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना अचानक फोन वाजला अन् बाईकने पेट घेतला;मोठा अनर्थ टळला

0
9

छत्रपती संभाजीनगर:- मोबाईल वापरताना काळजी घेतली नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते. गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये, पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलू नये, या गोष्टींची खबरदारी घेतली गेली नाही तर धोका निर्माण होतो. छत्रपती संभाजीनगर शहरात अशीच एक दुर्घटना घडली. एक दुचाकीस्वार पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेला. त्याचवेळी त्याच्या मोबाईवर रिंग वाजली. त्यामुळे दुचाकीने पेट घेतला. नशिब बलवत्तर म्हणून पेट्रोल पंपावर मोठी दुर्घटना घडली नाही.

संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील बजाज ऑटो गेट समोरील पेट्रोल पंपावर एक दुचाकीस्वार दुचाकीमध्ये पेट्रोल भरत होता. त्यावेळी अचानक त्याच्या मोबाईल कॉल आला. त्यामुळे रिंग वाजली. तो पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा होता. त्याचवेळी दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, गाडीने अचानक पेट घेतल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. प्रसंगावधान राखत दुचाकीस्वाराने व पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी लोटत लांब नेली. त्यानंतर तातडीने आग विझवली.

पेट्रोल पंपावर कोणी फोनवर बोलत असले तर त्या ठिकाणी असलेले कर्मचारी लगेच फोन ठेवायला सांगतात. तसेच पेट्रोल पंपावर धुम्रपान करु नका, मोबाईल फोन वापरु नका, अशी चेतावणी देणारी चिन्हेही असतात.पेट्रोल पंपावर मोबाईल न वापरण्यामागे कारण मोबाईलमधील इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे पेट्रोलची वाफ लागलीच पेट घेते. तसेच जवळच्या धातूच्या वस्तूंमध्ये विद्युतप्रवाह निर्माण करू शकते. यामुळे पेट्रोल पंपावर मोबाईल वापरता येत नाही.