हाणमंत गवळे/नांदेड ता.18- किनवट तालुक्यातील गोंडजेवली तांडा येथिल इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मेळावा घेण्यात आला.या मेळाव्यात सात कौशल्ये यांचे मूल्यमापन करण्यात आलेले आहे. त्यात नाव नोंदणी,शारीरिक विकास,बौद्धिक विकास,सामाजिक व भावनिक विकास,भाषा विकास, गणनपूर्व तयारी,नवीन प्रवेश घेतलेल्या बालकांचे व मातांचे स्वागत करण्यात आले.साहित्य वाटप करण्यात आले.
विध्यार्थ्यांच्या सर्व नोंदी तपासण्यात आलेल्या आहेत सर्व पालकांनी उत्साहाने या मेळाव्यात सहभाग घेतला.या मेळाव्यात पालक मोठ्या संख्यने उपस्थित होते.प्रारंभी सजविलेल्या बैलगाडी तून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली मुलांना पाठ्यपुस्तक व अंकलीपी तसेच नंतर गोड जेवणाचा शालेय पोषण आहार देण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सरपंच सुधाकर जाधव, शालेय समितीचे सर्व तसेच ग्रामस्थ व मोठ्या संखेने पालक उपस्थित होते.
पालकांच्या हस्ते शालेय पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी सरपंच सुधाकर जाधव,उत्तम बाबळे,आचारे बस्वराज,राजेश बुरावाड, विद्यार्थी व पालक ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक दिलीप वाघमारे,यांनी परिश्रम घेतले.
गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बन्ने ,शिक्षणविस्तार अधिकारी संजय कराड,केंद्र प्रमुख कौड सत्यनारायण,प्रमोद रत्नाळीकर कौतुक केले.