शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा : खा. अशोकराव चव्हाण

0
65

नांदेड  : शक्तिपीठ महामार्गाला  नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. याविरोधात मंगळवारी नांदेड मधील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहे. यावेळी खासदार आशोकराव चव्हाण  यांनी आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांची भेट घेवून शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारले आहे. यावेळी खासदार अशोकराव चव्हण यांच्याशी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी बातचीत केली असता खासदार चव्हाण म्हणाले की,शक्तीपीठ महामार्गाला जनतेचा विरोध आहे आणि म्हणून लोकांची सहमती घेतल्याशिवाय काही करू नये, असे माझे मत आहे, ते रद्द व्हावा, अशी मागणी मी पण केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो असल्याचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितले आहे.