गोडजेवली तांडा येथे मतदार जनजागृती कार्यक्रम

0
42

नांदेड –आपले भविष्य चांगले करायचे असेल तर आपण व परिवारातील सर्व मतदारांना मतदान करायला प्रवृत्त करा. मतदान न केल्याने चुकीच्या व्यक्ती सत्तेत बसतात. तेव्हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या राज्याच्या व देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तीला देखील आपले ऐकावे लागेल. यासाठी प्रत्येकाने मतदान करावे. अशी प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांनी केले. ८३किनवट मतदार संघात मतदानांची टक्केवारी वाढवण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना( भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली येथील गोंडजेवली तांडा व गोंडजेवली येथे मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच्या शुभारंभी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
स्वीप कक्षाचे शाहीर मार्तंड कुलकर्णी यांनी पोवाडा सादर केला.कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांनी सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी व नवमतदांसह ,तसेच मतदान शपथ दिली याप्रसंगी
SVEEP मतदार जनजागृती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडजेवली तांडा येथे गावकऱ्यांना मतदान करून आणि लोकशाही मजबूत करण्याचे आव्हान दिले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना संवाद साधले व शैक्षणिक गुणवत्ता व वृक्षारोपण व संगोपन विद्यार्थ्यांकडून आपल्या पालकांसाठी मतदान करावे यासाठी संकल्प पत्र भरून घेण्यात आले. तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी गावातून मतदान जन जागृती रॅली व इतर उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले व दिलीप वाघमारे या शिक्षकांचे कौतुकाची थाप दिली.
यावेळी SVEEP कक्ष 83-किनवट विधानसभा
जी.आर. राठोड (Beo) कक्षप्रमुख
उत्तम कानिंदे ,केंद्रप्रमुख,प्रा.डॅा.मार्तंड कुलकर्णी,प्रा.डॅा. पंजाब शेरे ,रुपेश मुनेश्वर,रमेश मुनेश्वर,शेषराव पाटील,मल्लीकार्जुन स्वामी,भुमय्या इंदुरवार ,सुरेश पाटील ,सुरज पाटील,सचिन कोंडापलकुलवार,सारंग घुले इ सदर कार्यक्रमासाठी उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे यांनी परिश्रम घेतले व आभार मानले कार्यक्रमास नवमतदांरासह, विद्यार्थी उपस्थित होते.