पुस्तक निर्मिती उपक्रम व सारांश लेखन;विद्यार्थी,शिक्षक व अधिकारी सन्मानित

0
115
धाराशिव,दि.३1 – महावाचन उत्सव २०२४ अंतर्गत सारांश लेखन जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेते विद्यार्थी तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रम २०२४-२५ मध्ये जिल्हास्तरावर पुस्तक निर्मिती उपक्रमात सहभागी शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांना २९ जानेवारी रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या मंचावर आयोजित कार्यक्रमात पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आ.प्रवीण स्वामी यांची तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दयानंद जटनुरे,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंखे,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संजय मगर,प्रा.डॉ.अंजली सूर्यवंशी, डॉ.गजेंद्र जमादार,प्रा.उमेश नरवडे, प्रा.शेख यांची उपस्थिती होती.
महावाचन उत्सव-२०२४ अंतर्गत सारांश लेखन जिल्हास्तरीय स्पर्धेत विजय ठरलेल्या गट वर्ग ३ ते ५ मध्ये प्रथम – ईश्वरी गायकवाड,जि.प.बोरखेडा ता.धाराशिव,द्वितीय – स्नेहा वाडकर, जि.प.शाळा वडगाव सि.ता.धाराशिव, तृतीय – भक्ती तानवडे जि.प.प्रा.शाळा सावरगाव तुळजापूर,
गट वर्ग ६ ते ८ मध्ये सायली सूर्यवंशी जि.प.शाळा,सांजा ता.धाराशिव प्रथम,आरती गंजे श्री भैरवनाथ विद्यालय, चिकुंद्रा, ता.तुळजापूर,ही द्वितीय,तृतीय – संगीता भोसले जि.प.शाळा गंधोरा,ता.तुळजापूर,
तृतीय गट वर्ग ९ ते १२ वी गटात प्रथम – भारती कदम,स्वामी विवेकानंद महाविद्यालय,अंतरवली,द्वितीय – सिद्धी घोडके,छत्रपती शिवाजी हायस्कूल, धाराशिव आणि तृतीय- इंद्रायणी जाधव, धरित्री विद्यालय, आलियाबाद, नळदुर्ग, ता. तुळजापूर यांना सन्मानित करण्यात आले.जिल्हास्तर पुस्तक निर्मिती उपक्रमात सहभागी शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यामध्ये इयत्ता पहिली ते तिसरीसाठी चांदोबा काव्यसंग्रह – मनीषा क्षीरसागर, प्राथमिक शिक्षिका जि.प.प्राथमिक शाळा खोताचीवाडी ता.तुळजापूर,गंधफुले काव्यसंग्रहासाठी वैशाली गायकवाड, प्राथमिक पदवीधर शिक्षिका, जि.प. प्रशाला तुळजापूर,
इयत्ता पहिली ते तिसरी आणि नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गंमत गाणी त्रिवेरा त्रेझर मराठी व इंग्रजीमध्ये लिहिणाऱ्या संगीता थडवे, प्राथमिक शिक्षिका जि.प.शाळा धारूर ता.जि.धाराशिव,
इयत्ता पहिली ते तिसरीसाठी अक्षरांच्या गावाला जाऊया – पुष्पलता पांढरे, प्राथमिक शिक्षिका, जि.प.प्रा.शाळा जगदंबा नगर, कडदोरा,ता.उमरगा, इयत्ता पहिली ते तिसरी मधुबाला आवटे, चिमुकल्यांची काव्यनगरी,प्राथमिक शिक्षिका जि.प.प्रा.शाळा लोहारा खु.ता. लोहारा
इयत्ता पहिली ते तिसरी फन टाइम- अनिता देशमुख,प्राथमिक शिक्षिका जि.प प्रा.शाळा स्पेशल तेर केंद्र,तेर,इयत्ता पहिली ते तिसरी आणि इयत्ता चौथी ते पाचवी, मेंदीचा कोन आणि इतर गोष्टी व अभय साधक आणि इतर गोष्टी – सुभाष वैरागकर,प्राथमिक पदवीधर शिक्षक जि.प.प्रा. शाळा दापका यांची राज्यस्तरावर निवड,पहिली ते तिसरी आणि चौथी ते पाचवीकरिता – ओळखा पाहू मी कोण व चित्रमय बोधकथा यासाठी इंदुमती जाधव,जि.शिक्षक जि.प.प्रा शाळा,ढोकी केंद्र तेरणानगर,इयत्ता पहिली ते तिसरी – इडली आणि आंबोळी या पुस्तकासाठी रमेश बालवाड,प्राथमिक शिक्षक जि.प.शाळा मातोळा ता.उमरगा.
इयत्ता पहिली ते तिसरीकरिता काव्य कलिका पुस्तकासाठी हनुमंत पडवळ सहशिक्षक जि. प्र. प्रा.शा.शाळा शेलगाव दि.यांची राज्यस्तर निवड,इयत्ता पहिली ते तिसरी उषा गाडे – कार्टून मराठी व्याकरण, प्राथमिक शिक्षिका जि.प.प्रा.शाळा येणेगुर, ता.उमरगा.इयत्ता चौथी ते पाचवी करिता साठवणीतले शब्द बालकविता – मनीषा थडवे, प्राथमिक शिक्षिका जि.प.प्रा.शाळा खामकरवाडी,
इयत्ता चौथी ते पाचवीकरिता छोटा मी वारकरी – सोनाली आरडले, प्राथमिक शिक्षिका जि.प.प्रा.शाळा राजीव गांधी नगर,शिंगोली,धाराशिव,इयत्ता चौथी ते पाचवीकरीता – अनोखी सहल या पुस्तकाकरिता सीमा दुधगी, प्राथमिक पदवीधर शिक्षक जि.प.शाळा केशेगाव,ता. तुळजापूर,इयत्ता चौथी ते पाचवी भरार वारा – सुवर्ण शिनगारे जावळे, सहशिक्षिका जि.प.प्रा शाळा, शेलगाव ता.कळंब, इयत्ता चौथी ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी शाळेतील पहिला पाऊल व नावाडी या पुस्तकाकरिता विजय माने प्राथमिक पदवीधर शिक्षक जि.प.शाळा बावी, ता.धाराशिव, इयत्ता चौथी ते पाचवी खजिन्यातले मूल्यवान मोती- मनीषा कुलकर्णी, प्राथमिक शिक्षिका,जि.प.प्रा शाळा, मानेवाडी ता. तुळजापूर,
इयत्ता चौथी पाचवी दिपाली व्होट्टे – कवितेच्या दोन्ही आहेत कवितेच्या सुंदर दुनियेत,प्राथमिक शिक्षिका- जि.प.प्रा. शाळा,धोत्री,ता.तुळजापूर,इयत्ता चौथी ते पाचवी – बेसिक इंग्लिश इंग्रजी आणि मराठी या भाषेत बाळासाहेब चिवडे, सहशिक्षक जि.प.प्रा शाळा, मसला खू.ता. तुळजापूर,इयत्ता चौथी व पाचवी, निळयाभोर तळ्यात – बालाजी इंगळे, माध्यमिक शिक्षक ग्रामीण प्रशाला, माडज,ता.उमरगा,
वर्ग इयत्ता सहावी ते आठवी विक्रम पाचंगे – धाराशिव जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे, प्राथमिक पदवीधर शिक्षक,दीप शाळा, मानमोडी ता.तुळजापूर,इयत्ता सहावी ते आठवी थोरांचे चरित्रकाव्य – ज्ञानेश्वरी शिंदे नरवडे,सहशिक्षिका, जि.प.शाळा तामलवाडी,ता.तुळजापूर, इयत्ता सहावी ते आठवी अंतरंग उलगडताना- शुभांगी देशमुख पदवीधर शिक्षिका जि.प.कन्या प्रशाला, परांडा,इयत्ता सहावी ते आठवी,दीड शहाणा – आबासाहेब मारुती घाटे, प्राथमिक पदवीधर शिक्षक जि.प.शाळा, पिंपळा,ता.परांडा,
इयत्ता सहावी ते आठवी ज्ञानामृत – पल्लवी चव्हाण,सहशिक्षिका दीपक कन्या शाळा,परंडा,रोचक विज्ञानकथा,मंजुषा स्वामी,प्राथमिक पदवीधर शिक्षिका किणी, ता.धाराशिव,मुलांनो आपण बोलूया या पुस्तकासाठी बबिता महानोर- प्राथमिक पदवीधर शिक्षिका जि.प. प्राथमीक शाळा, मुर्टा, ता.तुळजापूर यांचे राज्यस्तरावर निवड झाली आहे.
इयत्ता सहावी ते आठवी आठवीकरिता मिसचिव्हस बट व्हेरियस कबीर या इंग्रजी पुस्तकाकरिता सरिता उपासे,पदवीधर शिक्षिका जि.प.शाळा जि.प.हायस्कूल उमरगा,
इयत्ता सहावी ते आठवी सहास कथा : आदिती आणि मनी या पुस्तकासाठी विकास ढगे प्राथमिक पदवीधर शिक्षक जि प प्रशाला, काटगाव ता.तुळजापूर, इयत्ता सहावी ते आठवीकरिता समाधान शिकेतोड – आपत्तीतील देवदूत या पुस्तकासाठी प्राथमिक शिक्षक जि.प.प्रा. राघुचीवाडी, इयत्ता सहावी ते आठवीकरिता श्री.राजश्री शाहू महाराज या पुस्तकाकरिता श्रीपती जमाले प्राथमिक पदवीधर शिक्षक, जि.प.प्रा.शा.शिंगोली ता.धाराशिव,
इयत्ता सहावी ते आठवी मिट्टी के गीत – उर्दू भाषेतील या पुस्तकाकरिता शेख मौला इस्माईलसाब,प्राथमिक पदवीधर शिक्षक, जि.प उर्दू प्राथमिक शाळा,तेर,इयत्ता सहावी ते आठवी सुंदर माझे जग या पुस्तकात सुषमा सांगळे-वनवे, जि.प.शा.शिक्षक काका नगर सांजा,इयत्ता नववी ते दहावीकरिता ओळख भारतीय नोबेल विजेत्यांची-या पुस्तकाकरिता भैरवनाथ कानडे,सहशिक्षक श्री. भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, चिकुंद्रा ता.तुळजापूर राज्यस्तर निवड
इयत्ता नववी ते दहावीकरिता आधुनिक विचार व विद्यार्थ्यांची प्रगती या पुस्तकात सूर्यकांत साळुंखे विस्तार अधिकारी पंचायत समिती, भूम.इयत्ता नववी ते दहावीकरिता जर्नी फॉर यंग एक्सप्लोरर या मराठी पुस्तकाकरिता जयमाला वाटणे जि.प.प्रा शाळा,गोंधळवाडी, तुळजापूर आणि इयत्ता अकरावी ते बारावीकरिता जीवन के रंग- हिंदी पुस्तकाकरिता कल्याणी तांबे,प्राथमिक शिक्षिका, रोहकल,ता. परांडा राज्यस्तर निवड या सर्व लेखक शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा,.अंजली सूर्यवंशी यांनी केले.संचालन शिक्षक भैरवनाथ कानडे यांनी तर उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉ.जटनूरे यांनी मानले.