धाराशिव दि.2 मे – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज धाराशिव शहरातील भोगावती नदीतील गाळ काढण्याचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष,जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मदने,जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगर परिषद धाराशिव,जलसंधारण विभाग,टाटा मोटर्स व नाम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून धाराशिव शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीतील गाळ काढण्यात येणार आहे.