34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home मराठवाडा/खान्देश परभणी जिल्ह्यात रुग्णांसाठी “उपशामक काळजी सेवा” सुरू

परभणी जिल्ह्यात रुग्णांसाठी “उपशामक काळजी सेवा” सुरू

0
22

blank

वेदनामुक्त जीवनासाठी शासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
गंभीर रुग्णांसाठी दिलासा: जिल्ह्यात घरपोच उपशामक काळजी सेवा
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात समितीची बैठक संपन्न
परभणी, दि.01 — रुग्णांना वेदनामुक्त, सन्मानपूर्वक आणि गुणवत्तापूर्ण जीवन जगता यावे यासाठी राज्यशासनाने ‘सार्वजनिक राज्य पॅलिएटिव्ह केअर सेवा (उपशामक काळजी) कार्यक्रम’ जिल्ह्यात सुरु करण्यात आला आहे.
या कार्यक्रममध्ये मुख्यतः आयुष्यांच्या शेवटच्या टप्प्यात व कधीच बरे न होणाऱ्या रुग्णांचा समावेश होतो. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर व राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरावर दि. २७ फेब्रुवारी रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पॅलिएटिव्ह केअर समितीची बैठक घेण्यात आली.
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. कल्याण कदम तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. ऋषिकेश देशपांडे व जिल्हा रुग्णालयातील तज्ञ वैद्य आणि सामाजिक कार्यामध्ये कार्यरत दोन स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यात कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंड विकार, श्वसन विकार, वृद्धापकाळाशी संबंधित आजार तसेच दीर्घकालीन व असाध्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. यापैकी अनेक आजार पूर्णपणे बरे होणारे नसून अशा रुग्णांना दीर्घकाळ उपचार व सतत काळजीची गरज भासते. अशा रुग्णांना केवळ उपचारच नव्हे तर शारीरिक वेदना कमी करणे, मानसिक आधार, सामाजिक समुपदेशक आणि घरपोच सेवा देणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर हि पॅलिएटिव्ह केअर सेवा सुरु करण्यात आली आहे..
पॅलिएटिव्ह केअर सेवाअंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत घरोघरी गंभीर रुग्णांचे २२ फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण करून सौम्य (स्थिर अवस्था), मध्यम (आंशिक इतरांवर अवलंबित रुग्ण), व तीव्र वेदना, पूर्णतः इतरांवर अवलंबून असणारे असे रुग्णांचे वर्गीकरण करून यादी बनविण्यात आली. त्यानुसार रुग्णांना आठवड्यातून एक वेळ अशी घरपोच सेवा दिले जाते, मध्यम (आंशिक इतरांवर अवलंबित रुग्ण) यांना १५ दिवसातून एक वेळ याप्रमाणे महिन्यातून दोन वेळा सेवा दिले जाते, सौम्य (स्थिर अवस्था) असणाऱ्या रुग्णांना महिन्यातून एक वेळ वैद्यकीय रुग्ण सेवा घरपोच दिले जाते.
जिल्हा रुग्णालय परभणी येथे सदर रुग्णांकरिता १० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय अंतर्गत २ ते ३ खाटा ह्या सदर रुग्णांकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहे. जे रुग्ण रुग्णालय पर्यंत पोहचू शकत नाहीत त्यांनी टेलीकन्सलटेशन, मानसिक आधारासाठी टेलीमानस टोल फ्री नंबर १८००८९१४४१६ चा वापर करावा.
रुग्णवाहिका १०८ आपत्कालीन सेवा ह्याचा देखील लाभ रुग्णांनी घ्यावा, तसेच सिप्ला फाऊनडेशनद्वारे कार्यरत टोल फ्री. १८००२०२७७७७ याचा देखील उपयोग करू शकता, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी केले.
सदर उपशामक काळजी कार्यक्रम विशेष मोहीम हि प्रभावीपणे अंमलबजावणीकरिता सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांना जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. ललित सरोदे यांच्या मार्फत ऑनलाईन माध्यमाद्वारे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

blank