
मुंबई, दि. 21 – बँकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशामध्ये पसार झालेल्या उद्योगपती विजय मल्याविरोधात मुंबईच्या विशेष न्यायालयाने आज अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. CBI ने त्याच्याविरोद्धात कोर्टात खटला दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी करताना कोर्टाने हा निर्णय जाहिर केला आहे. विजय मल्या हे सध्या लंडनमध्ये असल्यामुळे भारतात आले नाही त्यानंतर न्यायालयाने त्यांच्याविरोधात वारंट जारी केले आहे.
जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्टसोबत झालेल्या करारात ५० लाख रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी यापुर्वीच हैदराबाद न्यायालयाने मल्या विरोधात अजामीनपात्र वारंट जारी केले आहे.