8 डिसेंबरला अधिकारासाठी धडकणार ओबीसींचा मोर्चा- प्राचार्य अशोक जिवतोडे

0
11

 

बल्लारपूर,दि.21 : राष्ट्रीय ओबीसी महासंघ अंतर्गत बल्लारपूर तालुका ओबीसी कृती समितीच्या वतीने स्थानिक महिला महाविद्यालयाच्या संत तुकाराम सभागृहात आज २१ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत ओबीसींच्या सवैंधानिक न्याय मागण्या सरकारकडून मान्य करुन घेण्यासाठी येत्या 8 डिसेंबरच्या महामोर्च्याला लाखोंच्या संख्येने यशस्वी करण्याचे आवाहन  प्राचार्य डाॅ. अशोक जिवतोडे यांनी केले.ते या सभेच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.सभेला ओबीसी कृती समितीचे निमंत्रक सचिन राजुरकर, प्रा.चंद्रकांत खनके,प्राचार्य अनिल शिंदे,प्रणय काकडे, प्रा.मनोहर गोवारदीपे,ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, विश्‍वनाथ मुळे आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षापासून सत्ताधारी सरकारने ओबीसींच्या हक्कांना बाधा पोचविण्याचेच काम करुन त्यांना विकासापासून व नोकरीतील आरक्षणासह पद्दोन्नतीपासून रोखले आहे.आपण आजच जागृत झालो नाही तर भविष्यात आपल्या ओबीसी मुलांना नोकरीतच नव्हे तर इतर कुठल्याही क्षेत्रात जागा मिळणार नाही हे लक्षात घेऊन या ओबीसी महामोर्च्याच्या माध्यमातून जनजागृती गावागावापर्यंत पोचवून संघटन शक्ती दाखविण्याचे आवाहन यावेळी प्राचार्य जिवतोडे यांनी केले. येत्या ८ डिसेंबरला विधानभवनावर ओबीसींचा महामोर्चा धडकणार असून बल्लारपूर तालुक्याच्यावतीने गावपातळीवर जनसंपर्क राबविण्यात येत असल्याची माहीती प्रास्तविकात तालुका संयोजक चंद्रपूर बाजार समिती समितीचे संचालक गोविंदा पोडे यांनी दिली.
देशाला स्वातंत्र मिळून ६९ वर्षे झाली. परंतु ओबीसींना अद्यापही केंद्र व राज्य सरकारकडून न्याय मिळाला नाही. परिणामी ओबीसी समाज सुविधांपासून वंचित झाला आहे. याच अनुषंगाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आंदोलनात्मक भूमिका घेतली असून ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचे विचार निमंत्रक सचिन राजूरकर यांनी व्यक्त केसे. बैठकीत ओबीसींची जातीनुसार जनगणना करण्यात यावी, मंडल आयोग स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी सरकारने लागू कराव्या, ओबीसी समाजातील शेतकरी, शेतमजुरांना ६० वर्षानंतर नवृत्ती वेतन योजना लागू करावी, ओबीसींचा अँटड्ढासिटी कायद्यात समावेश करावा, कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेटची निर्मिती करावी, शेती मालाला उत्पादन खर्चावर बाजरभाव देण्यात यावे आदीवर सविस्तर चर्चा करण्यात आली