Home मराठवाडा देशांतर्गत विमान प्रवासी भाड्यात होणार कपात

देशांतर्गत विमान प्रवासी भाड्यात होणार कपात

0

नवी दिल्ली – देशांतर्गत प्रवासी विमान भाडे 5 ते 10 टक्के कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इंधनाच्या किमतीत घट झाल्याने एव्हिएशन टर्बाईन फ्युएल (एटीएफ) च्या दरात 11.3% घट झाली आहे.

सध्या देशात एव्हिएशन टर्बाईन फ्युएल (एटीएफ) डिझेलपेक्षा स्वस्त झाले आहे. त्याचा दर 46 रुपये प्रति लिटर झाला आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘एटीएफच्या दरात दिल्लीमध्ये 5,909.9 रुपये प्रती किलोलिटर कपात करण्यात आली आहे. त्यामुळे एटीएफचा नवीन दर आता 46,513 प्रती किलोलिटर असा राहील. ‘एटीएफ‘ची रक्कम विमान कंपन्यांच्या एकूण खर्चाच्या 40 टक्के एवढी असते. चालू महिन्यात एटीएफच्या दरात थोडीफार घट झाली होती.

मागील महिन्यात 2 डिसेंबररोजी सरकारने विनाअंशदानित एलपीजी सिलिंडर 113 रुपयांनी स्वस्त केला होता. त्याचप्रमाणे विमानासाठी लागणारे इंधन अर्थात जेट फ्युएल 4.1 टक्के स्वस्त करण्यात केले होते. गेल्या दोन महिन्यात एव्हिएशन टर्बाईन फ्युएलमध्ये दोन वेळा दर कपात झाली आहे.

Exit mobile version