Home मराठवाडा 18 जुलैच्या आंदोलनात आर्य वैश्य समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-संतोष उत्तरवार

18 जुलैच्या आंदोलनात आर्य वैश्य समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-संतोष उत्तरवार

0
नांदेड,,दि.17ः- आर्य वैश्य समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकाच्या उन्नतीसाठी ‘आर्य वैश्य समाजाच्या वतीने शासनाविरुद्ध उपोषण आंदोलनाचे अस्त्र उपसण्यात आले आहे.
कर्नाटक सरकारने नुकतेच अार्य वैश्य समाजासाठी विशेष “अार्थिक  विकास महामंडळ स्थापन करुन त्याला तात्काळ निधीची तरतुद केली अाहे.
कर्नाटक सरकार हे करु शकते तर अापला समाज महाराष्ट्रात मोठया संख्येने असताना व समाजातील अनेक लोक दारिद्रय रेषेच्या खाली जीवन जगत असताना महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारे “अार्थिक विकास महामंडळ” स्थापन करण्यास महाराष्ट्र सरकरला अडचण नसावी असा प्रश्न समाजातील गरीब घटकाकडुन विचारला जात अाहे
अार्यसमाजातील गरीब घटकाच्या उन्नतीसाठी शासनाने ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करावे, अशी प्रमुख मागणी संस्थेच्या वतीने करण्यात येत असुन
सध्या नागपुर येथे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. शासनाचे लक्ष आपल्या ह्या मागणीकडे वेधन्यासाठी समाजाच्या वतीने हे आंदोलन दि. १८ जुलै, बुधवार रोजी स. १०:३० वाजता यशवंत स्टेडियम, नागपुर येथे होणार आहे.या आंदोलनात आर्य वैश्य समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आर्य वैश्य समाजाचे युवा कार्यकर्ते संतोष उतरवार यांनी केले आहे.
ह्या बाबत यवतमाळ येथे ‘आर्य वैश्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महाराष्ट्र’ ची बैठक नुकतीच पारपडली. बैठकीमध्ये आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. आर्य वैश्य समाजाच्या ईतिहासातील हे पाहिले आंदोलन असून आंदोलनाला तामसा, हदगाव, कोंडलवाडी,  हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, पुसद, हिवरा, दारव्हा, दिग्रस, आर्णि, चंद्रपुर, यवतमाळ, अमरावती, मूल, उदगीर, लातूर, नांदेड, औरंगाबाद, पुणे, अशा सर्वच भागातून प्रचंड पाठिंबा मिळत असल्याची माहीती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
हा लढा ‘आर्य वैश्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महाराष्ट्र’ च्या वतीने अशोकभाऊ कंचलवार,  यांच्या नेतृत्वाखाली किशोर नालमवार, नंदकुमार लाभशेटवार,प्रवीण दमकोंडवार, म्हानंद चक्करवार, सुशिल बंडेवार, संतोष उत्तरवार, किरण मुक्कावार ह्यांच्या पुढाकाराने उभारण्यात येत असून दि. १८ जुलै २०१८, बुधवार रोजी नागपूर येथे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्याचे ठरले आहे. त्यानुसार हे आंदोलन यशवंत स्टेडियम, नागपुर येथे होणार आहे. तरी समाजातील प्रत्येक घटकाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन  संतोष उतरवार,संदीप गादेवार, संतोष चेवुलवार, राजकुमार मुत्तेपवार, बालाजी पांपटवार  ह्यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version