
नांदेड़,दि. २९ : ::गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भागात विशेष कामगीरी बाजावत अनेक नक्षलवादी जेरबंद करण्यात सिंहाचा वाटा असून अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात साडेतीन वर्षे पूर्ण विशेष सेवा बजावली.या कार्याची दखल घेत पोलीस महासंचालक यांनी सध्या ग्रामिण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक गोविंद विजयराव खैरे पाटील यांना विशेष सेवा पदक नुकतेच जाहीर केले आहे.
पोलीस उपनिरीक्षक गोविंद खैरे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भागात असलेल्या पेंढरी पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून केले आहे. त्या दरम्यान दोन वेळा नक्षली चकमक झाली यावेळी एका नामी नक्षलवादयाला अटक करण्यात आली. तर दोन नक्षलवादी समर्पित करण्यात आले . तसेच छत्तीसगढ महाराष्ट्र सीमेवर चोवीस किमी चा पक्का रस्ता करण्यासाठी नक्षली लोकाकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता शांततेत रस्ता पूर्णत्वास नेला यासाठी खबरदारी घेतली गेली.पेंढरी पोलीस ठाणे हे अतिशय संवेदनशील ठाणे असुन या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवादी कारवाया जास्त प्रमाणात होत असतात या कठीण पोलिस ठाण्यात गोविंद खैरे पाटील यांनी यांची अतिशय शांत पणे विशेष सेवा बजावली. नक्षलवादी कारवाया थांबवून साडेतीन वर्षे सेवा पूर्ण केली त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरी बंद्दल त्यांना जुन 2018 मध्ये पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाने सन्मानित करण्यात आले होते.
आता पोलीस महासंचालक जायसवाल यांनी विशेष सेवा पदक जाहीर केले असून एका समारंभात विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड यांच्या हस्ते हे पदक प्रधान करण्यात यावे असे नमुद करण्यात आले आहे. खैरे पाटील यांना विशेष सेवा पदक मिळाल्या बंद्दल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव, अति. पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे , ग्रामिण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या सह सर्व कर्मचारी व नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.