औरगांबाद,दि.20ः-केंद्रीय पत्रकार संघटनेच्या (CPJA)औरंगाबाद जिल्हा अध्यक्षपदी गंगापूर तालुक्यातील प्रसिध्द मराठी साहित्यिक, गीतकार, संगीतकार, कथा पटकथा लेखक योगेश तुळशीराम मोरे यांची निवड केंद्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप वि.कसालकर यांच्या निर्देशानुसार तसेच केंद्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रभारी कमलेश गायकवाड यांनी केली आहे.तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले,औरंगाबाद जिल्हाअध्यक्ष रामेश्वर दरेकर,संपादक छबुराव ताके,समाधान वाणी,खान एजाज अहमद,अशोक काळकुटे,सुग्रीव मुंढे,नगरसेवक प्रदीप भैय्या पाटील,विजय पानकडे,भाग्येश गंगवाल,स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष वाल्मिक सिरसाट, सचिव आबासाहेव शिरसाट,वकील संघाचे अध्यक्ष ऍड. दत्ता पानकडे,ऍड.अशोक करडे,अखिल भारतीय सेनेचे लक्ष्मण बहिर,प्रहार संघटनेचे भाऊसाहेब शेळके,पंचफुला प्रकाशनचे डॉ.बालाजी जाधव,कोहिनुर व्यायाम शाळेचे संचालक अलिम कुरेशी,शिक्षक साईनाथ कबाडे,सतीश कबाडे,राजेश हिवाळे,भगवान हिवाळे आदींनी योगेश मोरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.