26.5 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home गुन्हेवार्ता सोनी येथे बॅटरी साहित्य हस्तगत

सोनी येथे बॅटरी साहित्य हस्तगत

0
340

गोरेगाव,दि.20- पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सोनी येथील बाजार चौकात लावलेले हायमाॅस्ट लाईटची बॅटरी व साहित्य लंपास करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अज्ञात चोरट्यांचा बेत फसला. 20 मार्चच्या रात्री सुमारे 1.00 च्या दरम्यान चोरीसाठी गेलेल्या चोरट्यांना एका इसमाने बघताच साहित्य तिथेच सोडून त्यांनी पळ काढला. .त्या  ग्राम पंचायत सोनी येथील बाजार चौक येथे लावलेले हायमास्ट स्ट्रीटलाईटची बॅटरी अज्ञात चोरट्यानी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आल्यानंतर ते साहित्य हस्तगत करण्यात आले.ग्राम पंचायत सरपंच उषाबाई वलथरे,उपसरपंच अशोक पटले,प्रकाश बघेले,मालीकराम टेंभरे,गौरीशंकर गौतम,यमेश पटले,दिनेश रहांगडाले,गोविंद पुंडे,विश्वनाथ पटले यांच्या उपस्थितीत पंचनामा करुन गोरेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली.