24.1 C
Gondiā
Monday, August 24, 2026
Home राष्ट्रीय देश गुजरातमध्ये दारुबंदी पण उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा ‘फुल टाईट’

गुजरातमध्ये दारुबंदी पण उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा ‘फुल टाईट’

0
20
अहमदाबाद, दि. 9 – दारुबंदी असलेल्या गुजरातमध्ये उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या मुलाने मद्यपान करुन अहमदाबाद विमानतळावर गोंधळ घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. नितीन पटेल यांचा मुलगा जयमान त्याच्या कुटुंबासह सुट्टीसाठी ग्रीसला निघाला होता. सोमवारी पहाटे जयमान पत्नी आणि मुलीसह अहमदाबाद विमानतळावर आला त्यावेळी तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता.
त्याला धड उभेही राहता येत नव्हते. त्याने व्हीलचेअरवर बसून इमिग्रेशन आणि अन्य तपासण्या पूर्ण केल्या. जयमानने अतिमद्यपान केले असल्याने त्याला कतार एअरवेजच्या कर्मचा-यांनी विमानात चढण्यापासून रोखले. त्यामुळे संतापलेल्या जयमालने एअरवेजच्या कर्मचा-यांबरोबर वाद घातला. दरम्यान नितीन पटेल यांनी गांधीनगरमध्ये बोलताना मुलाने मद्यपान केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.