Home राष्ट्रीय देश अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून

अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून

0

नवी दिल्ली, दि. २१ – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेश २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून २८ फेब्रुवारीरोजी अर्थमंत्री अरुण जेटली हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर रेल्वे अर्थसंकल्प २६ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे.
नरेंद्र मोदी सरकारचे हे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. गेल्यावर्षी सत्तेवर आल्यावर मोदी सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा नव्हत्या. तर रेल्वे अर्थसंकल्पातही नवीन असे काहीच नव्हते. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. २८ फेब्रुवारीरोजी अरुण जेटली दुस-यांदा सभागृहासमोर बजेट सादर करणार असून या अर्थसंकल्पात जेटली सर्वसामान्यांसाठी काय घोषणा करतात याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. तर रेल्वेमंत्री सुरेश फ्रभू २६ फेब्रुवारी रेल्वे बजेट मांडतील. तोट्यात आलेल्या रेल्वेला नवसंजीवनी देण्यासाठी प्रभू काय उपाययोजना राबवतात, मुंबईकरांना रेल्वेच्या त्रासातून दिलासा देतील का याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिला टप्पा २३ फेब्रुवारी ते २० मार्च आणि दुसरा टप्पा २० एप्रिल ते ८ मेपर्यंत चालेल. आर्थिक पाहणी अहवाल २७ फेब्रुवारी रोजी जाहीर होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

Exit mobile version