29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राष्ट्रीय देश व्ही. के. सिंग पुन्हा बरळले, मीडियाला म्हटले प्रेस्टिट्यूट

व्ही. के. सिंग पुन्हा बरळले, मीडियाला म्हटले प्रेस्टिट्यूट

0
25

blank

नवी दिल्ली, दि. ८ – वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांची जीभ पुन्हा घसरली असून एका ट्विटमध्ये त्यांनी मीडियाला ‘प्रेस्टिट्यूट’ म्हटले आहे. सिंग यांच्या या विधानावर सर्व राजकीय पक्षांनी टीका केली आहे. सिंग यांचे हे वक्तव्य अतिशय दुर्दैवी असून ते असंवेदनशील व्यक्ती आहेत, अशी टीका काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याच्या मोहिमेवर असलेल्या सिंग यांनी हे काम पाकिस्तान हाय कमिशनला भेट देण्यापेक्षा कमी थरारक आहे, असे विधान सिंग यांनी मीडियाशी बोलताना केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून चर्चा सुरू झाली असतानाच सिंग यांनी मीडियाबद्दल असे ट्विट करत आणखी नवा वाद ओढवून घेतला.

blank