Home राष्ट्रीय देश सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

0

नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी संसद आणि रस्त्यावर मोदी सरकारविरोधात मोर्चा उघडल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पुढे सरसावल्या आहेत. सोनिया गांधींनी बुधवारी लोकसभेत मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीबद्दल दिरंगाई करत असल्याचा आरोप केला.त्या म्हणाल्या, ‘मुख्य माहिती आयुक्ताच्या नियक्तीच्या दिरंगाईकडे मी सरकारचे लक्ष वेधू इच्छिते. हे पद गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त आहे. केंद्रीय माहिती आयोगाच्या तीन आयुक्तांचीही पदे रिक्त आहेत.’कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी जोरदार हल्ला चढवताना केंद्र सरकार म्हणजे काही लोकांचे, एका व्यक्तीकडून काही लोकांच्याच कल्याणासाठी चालविले जाणारे सरकार असल्याची टीका केली. गेल्या वर्षभरात या सरकारने काहीच काम केले नसल्याने त्यांच्याकडे आता दाखवण्यासारखेही काही नाही, असाही टोला त्यांनी लगावला.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सकाळी संसदीय मंडळाची बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी आरोप लावला, की पंतप्रधान मोदींनी परदेशात जाऊन यूपीए सरकारची बदनामी करण्याची मोहीम सुरु केली आहे. त्यासोबतच त्या म्हणाल्या, भाजप खासदर महात्मा गांधीच्या मारेकऱ्याला महामहिम पंडित उपाधी देत आहेत.

Exit mobile version