Home राष्ट्रीय देश सलमानला दिलासा, २ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर

सलमानला दिलासा, २ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर

0

मुंबई – अभिनेता सलमान खानला हिट अँड रन प्रकरणात तात्पुरता दिलासा मिळाला असून उच्च न्यायालयाने त्याला २ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. बहुचर्चित हिट अ‍ॅण्ड रन खटल्यात सलमानला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्याला पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सलमान खानच गाडी चालवत होता. तो दारू पिऊन गाडी चालवत होता असे न्या. डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी म्हटले आहे. त्याच्यावरील सर्व आरोप सिद्ध झाले आहेत.

आता सलमानप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यानंतरच सलमानची रवानगी तुरुंगात होणार की नाही, हे स्पष्ट होईल.

दरम्यान आज सलमान खानचा चालक अशोक सिंह याची हिट अँड रन प्रकरणात झालेल्या सुनावणीत साक्ष खोटी आहे असे न्यायालयाने म्हटले. आपल्याला कमी शिक्षा व्हावी अशी प्रार्थना सलमान खानने न्यायालयाकडे केली आहे. सलमान खानच्या एनजीओ मार्फत समाजकार्य केले जाते. त्याच्यावर शेकडो लोक निर्भर आहेत तेव्हा त्याला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी बचावपक्षाने केली आहे. त्याला तीन वर्षांची शिक्षा देण्यात यावी अशी विनंती बचावपक्षाने केली. मात्र न्यायाधीशांनी सलमानला ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Exit mobile version