39.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home राष्ट्रीय देश १५० रेल्वे गाडय़ांचे तिकीट दर ठरविण्याचा खासगी कंपन्यांना अधिकार

१५० रेल्वे गाडय़ांचे तिकीट दर ठरविण्याचा खासगी कंपन्यांना अधिकार

0
23

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.06 : देशातील रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. भारतीय रेल्वेने १०० रेल्वे मार्गाची पाहणी केली असून या मार्गावर लवकरच १५० खासगी रेल्वे धावणार आहेत. इतकेच नव्हे तर या रेल्वेत किती तिकीट आकारायचे याचा अधिकार खासगी कंपन्यांना असणार आहे. खासगी कंपन्यांना बाजार भावानुसार प्रवाशांकडून तिकीट वसूल करण्याची मुभा मिळणार आहे.

भारतीय रेल्वे व नीती आयोगाच्या खासगी ऑपरेटर्सकडून १०० रेल्वे मार्गावर १५० खासगी रेल्वे धावण्याला परवानगी मिळाल्यानंतर रोडमॅप तयार करण्यात आला आहे. यासंदर्भात एक डिस्कशन पेपरही आणण्यात आला आहे. खासगी रेल्वेतून २२ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक येऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. अर्थ मंत्रालयाने १९ डिसेंबर रोजी पब्लिक प्रायव्हेट अप्रेजल कमिटीकडून दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

देशभरात १०० रेल्वे मार्गावर १५० खासगी रेल्वे धावणार असून यासाठी लांब पल्ल्याच्या गाडय़ांची निवड केली आहे, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. मुंबई-कोलकाता, मुंबई-चेन्नई, नवी दिल्ली-मुंबई, तिरुवनंतपूरम-गुवाहाटी, नवी दिल्ली-कोलकाता, नवी दिल्ली-बेंगळूरु, नवी दिल्ली-चेन्नई, कोलकाता-चेन्नई. चेन्नई-जोधपूर या मार्गांचा समावेश आहे.तसेच, या प्रमुख मार्गापैकी मुंबई-वाराणसी, मुंबई-लखनऊ, मुंबई-नागपूर, नागपूर-पुणे, सिंकदराबाद-विशाखापट्टणम, पाटणा-बंगळूरु, पुणे-पाटणा, चेन्नई-कोईबंतूर, चेन्नई-सिंकदराबाद, सूरत-वाराणसी, भुवनेश्वर-कोलकाताचा समावेश आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे भरपूर मनोरंजन होणार
नवी दिल्ली : रेल्वेतील मोठा प्रवास प्रवाशांना आता कंटाळवाणा वाटणार नाही. रेल्वेच्या प्रवासादरम्यान प्रवाशांचे भरपूर मनोरंजन होणार आहे.भारतीय रेल्वेच्या पीएसयू रेलटेल यासाठी कंटेट ऑन पीएसयू रेलटेलने यासाठी कंटेट ऑन डिमांड ही सुविधा सुरू केली आहे. यानुसार लवकरच तुम्ही रेल्वेमध्ये आपल्या आवडीचा सिनेमा, सीरियल, गाणी किंवा भक्ती संगीताशी संबंधित कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकणार आहात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेल्वे प्रवासात या सुविधेसाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.तुमचा मोबाईल, लॅपटॉप किंवा आयपॅडचा डेटा देखील खर्च होणार नाही आहे. ही सुविधा मोफत असणार आहे. रेलटेलने या सुविधेसाठी टेंडर उघडले आहेत. यावर बोली लावली जात आहे. हे काम एका महिन्याच्या आत पूर्ण केले जाणार आहे.