38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राष्ट्रीय विदेश सुएझ कालव्यात अडकलेले एव्हरग्रीन जहाज काढण्यात अखेर यश

सुएझ कालव्यात अडकलेले एव्हरग्रीन जहाज काढण्यात अखेर यश

0
56

blank

नवी दिल्ली – अखेर पाच दिवसांनंतर प्रयत्नांनी इजिप्तमधील सुएझ कालव्यात अडकून पडलेले मालवाहू जहाज बाहेर काढण्यात यश आल्याचे वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने देण्यात आले आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम असा सागरी मार्ग जागतिक वाहतुकीसाठी पुन्हा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आशिया व युरोप दरम्यान वाहतुकीसाठी पनामाचा ध्वज असलेले एव्हरग्राीन नावाचे मालवाहू जहाज वापरण्यात येत होते. एका निमुळत्या भागात ते आफ्रिका व सिनाई द्वीपकल्पात मंगळवारी ते जहाज अडकून पडल्यामुळे मोठी सागरी वाहतूक कोंडी झाली होती. कालव्याच्या सहा किलोमीटर उत्तरेला दक्षिण प्रवेशद्वाराकडे ते सुएझ शहरानजीक हे अवाढव्य जहाज अडकून पडले होते. या जहाजाला बाहेर काढण्याचे प्रयत्न मंगळवारपासून सुरु होते. अखेर पाच दिवसांनंतर म्हणजेच रविवारी सायंकाळी या प्रयत्नांना यश आले. केप शिपिंग सर्व्हिसेसच्या हवाल्याने या जहाजाला बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

बर्नहार्ड शुल्ट जहाज व्यवस्थापन कंपनीचे तंत्रज्ञान व्यवस्थापक एव्हर गिव्हन यांनी दिलेल्या माहितीनुसार हे जहाज बाजूला काढण्याचे प्रयत्न शुक्रवारी फसले होते. हे मोठे जहाज हलवण्यासाठी आतील भागात पाणी ओतून विशिष्ट यंत्रणेचा वापर करून ते दूर करण्याचे प्रयत्न रविवारी करण्यात आले. या प्रयत्नांमध्ये अनेक टग बोट्स म्हणजेच मोठे जहाज अडकल्यानंतर ते खेचून बाहेर काढण्यासाठी वापरण्यात येणारी विशेष बोटी वापरण्यात आल्या. या प्रयत्नांना यश आले असून हजारो कंटेनर असणारे हे जहाज बाहेर काढण्यात आले आहे.

शनिवारी जहाज बाजूला करण्यासाठी सुएझ कालवा प्राधिकरणाने दोनदा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले होते. जास्त भरतीच्या लाटांचा फायदा घेऊन शनिवारी प्रयत्न केले गेले. जपानच्या शोई कायसन केके कंपनीने १० बोटी हे जहाज बाजूला काढण्यासाठी पाठवल्या होत्या. शोई कायसेन कंपनीचे अध्यक्ष युकिटो हिगाकी यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. हे जहाज पुन्हा तरंगू शकणार नसेल तर त्याचे कंटेनर्स वेगळे करावे लागणार आहेत, पण ते खूप अवघड असल्याचेही हिगाकी यांनी स्पष्ट केले आहे. हे जहाज बाहेर काढल्यानंतर आता त्याच्या सुरक्षेची चाचपणी करुन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

blank