खा. प्रफुल पटेलांच्या पुढाकाराने गोंदियात गुरुवारी कोरोना आढावा बैठक

पालकमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार

0
357

गोदिया दि.२३– जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि बाधित रुग्णांच्या आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी २४ सप्टेंबरला रोजी गुरुवारी गोंदिया येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीला गृहमंत्री तथा पालकमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख,खासदार प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत.

राज्यसभा सदस्य खा.प्रफुल पटेल यांनी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोना बाधित रुग्णांसाठी असलेल्या आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.आढावा बैठकीपूर्वी सायंकाळी ४.३० वाजता गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाला मान्यवर भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी करणार आहे. सायंकाळी ६ ते ७ वाजता दरम्यान सर्व मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसमवेत कोरोनाच्या संदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहे.