33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता कोसबी जंगल परिसरात सी-६० कमांडो पथकाचे नक्षलविरोधी अभियान, नक्षल साहित्य जप्त

कोसबी जंगल परिसरात सी-६० कमांडो पथकाचे नक्षलविरोधी अभियान, नक्षल साहित्य जप्त

0
703

blank

गोंदिया,दि.23ः – जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चीचगड पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या कोसबी जंगल शिवारात सी – ६० कमांडो पथकाने नक्षलविरोधी अभियान अंतर्गत सर्च ऑपरेशन मोहीम राबवली. या दरम्यान नक्षल्यांच्या वापरातील साहित्य पोलिसांच्या हाती लागले आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादी सक्रिय असल्याची बाब समोर आली आहे.जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेताच नक्षल्यांचा बिमोड करण्याच्या उद्येशाने नक्षल शोध मोहिम राबविण्याचे आदेश दिले. यावरून २२ सप्टेंबर रोजी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अतुल तावाडे, सपोनि. कमलेश पच्छाव यांच्या नेतृत्वात सी- ६० पथकाच्या जवानांनी कोसबी जंगल शिवारात सर्च ऑपरेशन राबविले. या दरम्यान नक्षल्यांकडून दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या वस्तू शोधण्यास पथकाला यश आले आहे. या साठवून ठेवलेल्या साहित्याची तपासणी केली असता त्या ठिकाणी पाच काळ्या रंगाच्या ताडपत्र्या मिळून आल्या. सदर ताडपत्र्यांचा उपयोग नक्षलवादी जंगलात राहण्याकरिता करत असल्याचे समजून आले. यावरुन सी – ६० जवानांच्या पथकाला हाती लागलेल्या साहित्यावरुन जिल्ह्यात नक्षल सक्रिय असल्याची बाब समोर आली आहे.

blank