तिरोडा,दि.21ः– कोरोना संसर्गाची आपत्ती ओढावली असतांना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हयातील प्रत्येक नागरिकांच्या खंबीर पणे पाठीशी उभी राहिली. प्रत्येक गरजूपर्यंत पोचून हवे तेवढे मदतीचे हात राष्ट्रवादी काॅंग्रेसनी दिले. त्याचप्रमाणे धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे कामांना प्राधान्याने देण्याचे काम खासदार प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून झाले आहे.शेतकऱ्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी पक्षा सदैव तत्पर राहिलेली आहे. त्यानुरूप यंदाही प्रती क्विंटल धानाला 700 रुपये बोनस जाहीर करण्यात आले असून शेतकऱ्यांना आता प्रति क्विंटल 2568 रुपये आधारभूत किंमत मिळणार आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूक लक्षात घेता राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्तांनी सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी दुर कराव्यात पुढाकार घ्यावा असा सल्ला माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी दिला.
तिरोडा तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्तांची बैठक खासदार प्रफुल पटेल यांचे निर्देशानुसार व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभारे लाॅन तिरोडा येथे संपन्न झाली.महिला जिला अध्यक्षा श्रीमती राजलक्ष्मी तुरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या बैठकीत प्रामुख्याने जिलाध्यक्ष पंचम बिसेन, महिला जिलाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर, तिरोडा शहर अध्यक्ष जिब्राईल पठान,अजय गौर, नरेश कुंभारे, डाॅ.अविनाश जायस्वाल, रवितकांत (गुडडू) बोपचे, राजु.एन.जैन, सलीम जवेरी, जगदीश कटरे, देवेन्द्र चौधरी, राजेश जायस्वाल, माजी जिला परिषद सदस्य विणा पंचम बिसेन, कैलाश पटले, मनोज डोंगरे, माजी पंचायत समिती सभापती निताताई रहांगडाले, राजकुमार असाटी, किशोर पारधी, ममता बैस, मनोहर राऊत, बबलु ठाकुर, विजय बुराडे, नत्थु अंबुले, जया धावाडे, थानसिंग हरिणखेडे, सुखदेव बिसेन, मायाताई शरणागत, बाल बावनथडे, बाडु भगत, रमेश पारधी, राजु ठाकरे, बाबुराव डोमरे, रवि पटले, राजेश तुरकर, वशीम शेख, किरण बंसोड, डुंडीलाल शरणागत व इतर प्रामुख्याने उपस्थित होते.