मुंबई,दि.29ः-मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. भेटीसीठी राज ठाकरे आपले निवासस्थान कृष्णकुंजवरुन रवाना होत राजभवनात पोहोचले. या भेटीमध्ये ठाकरेंनी लॉकडाऊन आणि अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दूध दराचा मुद्दा उचलून धरला आहे.राज ठाकरे यांनी राज्यपालांसोबतच्या भेटीपूर्वी कृष्णकुंजवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. राज ठाकरेंसोबतच्या बैठकीसाठी पुत्र अमित ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, शिरीष सावंत, रिटा गुप्ता यांसह इतर पदाधिकारी कृष्णकुंजवर दाखल झाले.
वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेले दुर्लक्ष यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती मनसे पक्षातर्फे करण्यात आली.
दुधाला योग्य दर मिळावा
‘शेतकऱ्यांकडून दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था शेतकऱ्यांना एका लिटरमागे 17 ते 18 रुपये देतात. आणि स्वत: मात्र भरघोस नफा कमावतात. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ यामुळे आधिच शेतकरी गांजलेला असतो. यामध्ये वाढत्या महागाईमुळे गुरांची देखभालही खूप महाग झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला किमान 27 ते 28 रुपये दर मिळायला हवा’ अशी मागणी मनसेने निवेदनाद्वारे केली आहे.
वाढीव वीज बिलाचा मुद्दा
यासोबतच राज ठाकरेंनी वाढीव वीज बिलाचा मुद्दा राज्यपालांसमोर मांडला. ‘लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना पाठवलेली वाढीव वीजबिले. आधीच उदरनिर्वाहाची साधने बंद, त्यात मुंबईसारख्या ठिकाणी रेल्वे गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. यामुळे लोकांनी राजगार गमावला आहे. अनेक अस्थापने बंद आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये वीज बिलांनी दिलेला शॉक जबरदस्त आहे. या विषयात माझे सहकारी वीज मंत्र्यांना भेटीन आले, आम्ही आंदोलने केली पण सरकार अजूनही यावर मार्ग काढायला तयार नाही. सरकारने वीज ग्राहकांना गेल्या महिन्यांच्या वीजबिलातील वाढीव रक्कम परत करायला हवी.’ हा मुद्दा राज ठाकरेंनी मांडला.