पंचायत राज समितीच्या सदस्यपदी आमदार डॉक्टर देवराव होळी

0
175

गडचिरोली =विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांची महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचेसह भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आमदार डॉक्टर देवराव होळी यांचे अभिनंदन केले आहे.