महाविकास आघाडी सरकारचा जाहिर निषेध

0
23

 गोंदिया– जिल्हा भाजयुमो च्या वतीने प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटिल यांच्या सूचनेनुसार तिरोडा विधानसभा चे आमदार विजयभाऊ राहंगडाले यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांच्या नेतृत्वात गोंदिया जिल्हामध्ये ओ.बी. सी. आरक्षणाच्या संदर्भात विधान सभेत आवाज बुलंद करणार्‍या भाजपाच्या १२ आमदाराना निलंबित करून महाराष्ट्र शासनाच्या लोकशाहीचा मुडदा पाडला असल्यामुळे महाविकास आघाड़ी सरकार च्या निषेध म्हणून जागोजागी पुतल्याचे दहन करण्यात आले .यामध्ये प्रामुख्याने उपस्थित भाजपा मंडल अध्यक्ष भाऊराव कठाने, नगराध्यक्ष सोनालीताई देशपांडे , मदन भाऊ पटले ,हर्ष मोदी जिल्हा युवा महामंत्री चिंतामणभाऊ रहांगडाले , उमाशंकर जी हारोडे, शहर अध्यक्ष स्वानंद पारधी , पप्पुभाऊ अटरे, माधुरीताई रहांगडाले, जिल्हा सचिव राजेश मलघाटे, युवामोर्चा शहर अध्यक्ष अमोल तितीरमारे , रवी मुटकुरे , वैभव पटले , नंदकिशोर रहांगडाले, राजु बीसेन,बालू ठाकरे , गौरव निनावे , बंटी श्रिवांसी व अन्य यांनी भाजपा युवामोर्चा गोंदिया कडुन महावीकास आघाडी सरकार च्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.