
सावली,दि.06ः– ओ.बी.सी. आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना निलंबित करून महाराष्ट्र शासनाने लोकशाहीचा मुडदा पाडला आहे.महाराष्ट्र सरकारचे हे वर्तन तद्दन दडपशाहीचे व तानाशाहीचे असून केवळ दोन दिवसाचे अधिवेशन व त्यातही विरोधकांना बोलू न देणे हे हुकुमशाहीचे धोरण असून अधिवेशनाच्या नावाने चाललेला हा तमाशा महाराष्ट्राचा अपमान आहे.
सरकारच्या या लोकशाही व ओ.बी.सी. विरोधी धोरणाचा तीव्र निषेध करीत हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी सावली तथा जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर तर्फे तहसीलदार सावली यांच्या मार्फत राज्यपाल यांना पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज भैय्या अहिर यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी अध्यक्ष भाजपा ता सावली तथा जिल्हाध्यक्ष भाजपाओबीसी मोर्चा अविनाश पाल, माजी जि. प.सभापती संतोष तंगडपल्लीवार, जि. प.सदस्या.सौ.योगिताताई डबले,प्रकाश पा.गड्डमवार,प्रकाश खजांजी,कृष्णा राऊत, विनोद धोटे,आशिष कार्लेकर,किशोर वाकुडकर, दिवाकर गेडाम,नामदेव भोयर,शोभा बाबनवाडे, प्रतिभा बोबाटे, तुळशीदास भुरसे,हरिष जकुलवार, मयुर व्यास,मयुर गुरनुले, विशाल RK,तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.